चीन सैन्याची पुन्हा एकदा घुसखोरी; भारत- चीन सैन्यामध्ये संघर्ष

चीन आणि भारत यांच्यातील ताण तणाव दिवसोगणीत वाढत चालला आहे. एकीकडे हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहेत. मात्र सीमेवर (india-china border) काही वेगळं चित्र पाहायला मिळत असल्याचे समोर आले आहे.

चीन आणि भारत यांच्यातील ताण तणाव दिवसोगणीत वाढत चालला आहे. एकीकडे हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहेत. मात्र सीमेवर (india-china border) काही वेगळं चित्र पाहायला मिळत असल्याचे समोर आले आहे. सीमेवर भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये ( Soldier) पुन्हा एकदा झडप झाल्याचं वृत्त आहे. भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिनी सैन्याला भारतीय सैन्याने वेळीच आवर घातला आहे.

दोन्ही देशातील तणावाचे वातावरण कमी करण्यासाठी दोन्ही देशातील सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही मुद्द्यांवर सहमती झाली होती. यातील काही मुद्द्यांचे उल्लंघन चीनच्या सैन्याने केल्याचे समोर आले आहे. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सैनिकांनी आधी ठरलेल्या एकमताचं उल्लंघन केलं आणि पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पँगोंग लेक परिसरात दोन्ही देशाचे सैनिक २९-३० ऑगस्टच्या रात्री आमने-सामने आले होते. पण भारतीय लष्कराने प्रतिकार करत पँगोंग आणि Tso Lake परिसरात चीनच्या सैनिकांना घुसखोरीपासून रोखलं.

दरम्यान, पँगोंग तलाव परिसरात दोन्ही सैन्यांमध्ये झटापट झाल्यानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. भारतीय लष्कर शांतता राखण्यावर विश्वास ठेवतं, पण आपल्या सीमेचं रक्षण करण्यास सक्षम असल्याची प्रतिक्रिया भारतीय लष्कराने दिली आहे.