महागाईचा भडका! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सलग १७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्चा तेलाची

कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. त्याचप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आज सलग १७ व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्चा तेलाची किंमत कमी असताना देखील, इंधनचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसल्याची चित्रे समोर दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात २० पैशांनी, तर डिझेलच्या दरात ५५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोलचा  भाव हा ७९.७६ रूपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेलचा दर हा ७९.४० रूपये प्रतिलिटर इतका आहे. 

दरम्यान, मुंबईत देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज मुंबईत पेट्रोल १८ पैशांनी वाढून पेट्रोलचा भाव ८६.५४ रुपये प्रतिलिटर झाला आहे. तर डिझेल ५२ पैशांनी महागले असून डिझेलचा भाव ७७.७६ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तसेच चेन्नईत पेट्रोलने ८३.०४ रुपयांचा स्तर गाठला आहे. त्याचप्रमाणे कोलकात्यात पेट्रोल ८१.४५ रुपये झाले आहे.