दसरा-दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; मात्र खाद्यतेलांच्या किमती कमी होणार

ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही प्रतिलिटर शंभरीच्या पार गेले असून, येत्या काळात पेट्रोलचे दर आणखी वाढतात की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

    नवी दिल्ली : ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीही प्रतिलिटर शंभरीच्या पार गेले असून, येत्या काळात पेट्रोलचे दर आणखी वाढतात की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.

    राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत, त्यातच नवरात्रीच्या काळात भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. कोबी, भेंडी, गवार यासारख्या भाज्यांच्या किमती बाजारात दुपटीने वाढलेल्या दिसतायेत. तर कांदा, टोमॅटो यांचे भावही वाढले आहेत. या निमित्ताने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी सर्वसामान्यांचे घरचे बजेट मात्र कोलमडलेले दिसत आहे.

    या सगळ्यात थोडी दिलासादायक बाब म्हणजे, दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किमती कमी राहाव्यात यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न होताना दिसतायेत. बुधवारी पाम, सोया आणि सूर्यफुलाच्या कच्च्या तेलावरील सामान्य सीमा सुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने गेतला आहे. यामुळे प्रतिलिटर १५ रुपयांनी तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी खआद्यतेलाच्या किमतीही गगनाला भिडलेल्या होत्या.

    खाद्य तेलाच्या किमती कमी होणार असल्या, तरी पेट्रोल-ढिझेल, घरगुती गॅस, सामान्य भाजीपाला, कांदे, टोमॅटो यांचे भाव जोपर्यंत अटोक्यात येत नाही, तोपर्यंत सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळाला असे नक्कीच म्हणता येणार नाही.