महागाईने उच्चांक गाठला! पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ…

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे, महागाईने उच्चांक गाठला आहे. सलग अकराव्या दिवशी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इंधन कंपन्यांकडून वाढ करण्यात आली आहे. आज बुधवार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५५

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे, महागाईने उच्चांक गाठला आहे. सलग अकराव्या दिवशी सुद्धा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात इंधन कंपन्यांकडून वाढ करण्यात आली आहे. आज बुधवार दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर हा ७७.२८ रूपये प्रतिलिटर इतका आहे. तर डिझेलचा दर हा ७५.७९ रूपये प्रतिलिटर आहे. त्यामुळे कालच्या आणि आजच्या दिवसात तीन रूपयांपेक्षा अधिक दरवाढ झाल्याचे दिसत आहे. 

दिल्लीत काल मंगळवार पेट्रोलच्या दरात ४७ पैशांची तर डिझेलच्या दरात ५७ पैशांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर हा ७६.७३ रूपये प्रतिलीटर होता. तर डिझेलचा दर हा ७५.१९ रूपये प्रतिलीटर इतका होता. दरम्यान, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्याचप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि इतर कारणांमुळे, जगभरातील कच्च्या तेल्याच्या किंमती निच्चांकी स्तरावर गेल्या आहेत. तरीही भारत सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये सतत दर वाढवण्याचा निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे जनहित लक्षात घेऊन इंधन दरवाढीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रातून केली होती. 

परंतु सलग अकराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत पेट्रोलचे दर ८४.१५ रूपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर ७४.३२ रूपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.८६ रूपये प्रतिलिटर, तर डिझेलचे दर ७३.६९ रूपये प्रतिलिटर झाले आहेत. त्यामुळे मुंबई आणि चेन्नईमध्ये सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.