Corona virus Vaccine

भारतात कोरोना व्हायरस लशीबाबत(Indain coroan vaccine) सगळ्या गोष्टींची माहिती एका पोर्टलवर(portal) मिळणार आहे. आयसीएमआर (ICMR) च्या या वॅक्सीन पोर्टलचे अनावरण आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केले आहे. लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी कोरोना वॅक्सीन पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

या पोर्टलवर कोरोनावरील लशींबाबत सध्या काय काम चालू आहे याविषयीची माहिती मिळणार आहे. हे पोर्टल सोमवारपासून सगळ्यांना पाहता येणार आहे. या पोर्टलवर विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठीेचे डोस आणि  लशी यांची माहितीदेखील उपलब्ध केली जाणार आहे.

सद्यस्थितीत भारतात ३ कोरोना लशींवर काम सुरु आहे. या तिन्ही लशींच्या ट्रायल्स वेगवेगळ्या पातळ्यांवर होणार आहे.भारतात  भारत बायोटेक-आयसीएमआरचे कोवॅक्सिन(COVAXINE), जायडल कॅडिलाचे जायकोव-डी(ZyKov-D) आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्रोजेनेचे कोविशील्ड(Covishield) या तीन कोरोना लशींवर काम सुरु आहे.