infosys director narayan murthy daughter akshata murthy is richer than queen elizabeth ii
भारतातील 'या' महिलेने श्रीमंतीत ब्रिटनच्या राणीलाही टाकलंय मागे

Infosys मध्ये अक्षताचे £430 दशलक्ष शेअर्स आहेत, ज्याची किंमत जवळपास ४,२०० कोटी रुपये आहे. तर महाराणीची संपत्ती जवळपास £350 दशलक्ष असून ती अंदाजे ३,४०० कोटी रुपये आहे.

नवी दिल्ली : भारातातील सर्वाधिक चर्चेत असणारी आयटी कंपनी इन्फोसिस (Infosys) चे अध्यक्ष नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांची कन्या अक्षता मूर्ती (Akshata Murthy) ब्रिटनमधील श्रीमंत महिलांपैकी एक आहे. युके मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत अक्षताने ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) लाही मागे टाकलं आहे.

ब्रिटनच्या महाराणीपेक्षाही श्रीमंत आहे अक्षता

ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनच्या एका अहवालामुसार, ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्याकडे 350 दशलक्ष पौंड म्हणजेच ३,४०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर अक्षता मूर्ती यांच्याकडे जवळपास ४३० दशलक्ष पौंड म्हणजेच ४,२०० कोटींची संपत्ती आहे.

अशी श्रीमंत झाली अक्षता मूर्ती

मूर्ती यांची कन्या अक्षताची इन्फोसिसमध्ये ०.९१ % भागीदारी आहे. ज्याची किंमत ४३० दशलक्ष पौंड म्हणजेच ४,३०० कोटी रुपये आहे. कौटुंबिक कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी पाहता अक्षताला ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंत महिलेचा बहुमान मिळाला आहे.

अक्षता यांचे पतीराज आहेत UK तील सर्वात श्रीमंत संसद सदस्य

उपलब्ध माहितीनुसार, अक्षता यांचे पती ऋषी सुनक यांच्याकडे २०० दशलक्ष पौंड म्हणजेच २००० कोटी रुपयांची संपत्ती आहे. ते ब्रिटनचे वित्तमंत्री असून तेथील सर्वाधिक श्रीमंत संसद सदस्यही आहेत.

ऋषी सुनक यांच्या अडचणी वाढल्या

तथापि, ब्रिटनच्या प्रत्येक मंत्र्याने आपली एकूण संपत्ती जाहीर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे कर्तव्य बजावत असताना नातेसंबंध आडवे येऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे. सुनक यांनी गेल्याच महिन्यात रजिस्ट्राररला दिलेल्या माहितीत अक्षता यांच्याशिवाय अन्य कोणाचाही उल्लेख केलेला नाही. सर्वात छोटी कंपनी कॅटामारान वेंचर्स युके लि. मध्ये पत्नी अक्षता यांचा मालकी हक्क नमूद केला असल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले आहे.

खुलासा केल्यानंतर सुरू झाली चौकशी

यानंतर अक्षता यांचे पती ऋषी सुनक जे युकेचे अर्थमंत्री आहेत, त्यांनी आपल्या संपत्तीबाबत पारदर्शकता न दाखविल्याने त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. द गार्डियन वृत्तपत्राने दावा केलाय की, अक्षता आणखी काही कंपन्यांवरही अध्यक्षपदावर आहेत, पण ऋषी यांनी सरकारी रजिस्टरमध्ये याचा उल्लेखही केलेला नाही.