वर्क फ्रॉम होम हवंय! ऑफिसला जाण्याऐवजी कर्मचारीच कंपनीला देत आहेत असा ऑप्शन की, त्यांच्यावरही आलीये अशी वेळ; वाचा सविस्तर

ज्या कंपन्या कामगारांना पुन्हा बोलावत आहेत तिथले कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी ‘वर्कफ्रॉम होम द्या, नाहीतर राजीनामा देतो’, अशी भूमिका घेताना दिसतायत. ‘फ्लेक्स जॉब’ या कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्या वर्क्र फ्रॉम होम देतायत अशा कंपन्यांचा शोध सध्या कर्मचारी घेताना दिसतायत.

  नवी दिल्ली : कोरोनामुळे नाइलाजास्तव गेल्या दीड वर्षापासून सगळ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करावं लागतंय. सुरुवातीला अनेकांना घरून काम करण्याचा कंटाळा आला; परंतु आता कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ आवडू लागल्याचं दिसतंय.

  ज्या कंपन्या कामगारांना पुन्हा बोलावत आहेत तिथले कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी ‘वर्कफ्रॉम होम द्या, नाहीतर राजीनामा देतो’, अशी भूमिका घेताना दिसतायत.

  ‘फ्लेक्स जॉब’ या कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्या वर्क्र फ्रॉम होम देतायत अशा कंपन्यांचा शोध सध्या कर्मचारी घेताना दिसतायत.

  फ्लेक्स जॉब या कंपनीने एप्रिल महिन्यात हे सर्वेक्षण केले होते. जगभरातील तब्बल २१०० कर्मचाऱ्यांवर केलेल्या सर्वेक्षणात निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होमला पसंती दिली. सोबतच यापुढेही घरातूनच काम करायला मिळावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे. घरातूनच काम केल्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो, असे अनेकांनी म्हटले आहे.

  ७० टक्के कंपन्या सकारात्मक

  फोरेस्टर या ग्लेबल रिसर्च फर्मनुसार यूएस आणि युरोपमधील ७० टक्के मल्टिनॅशनल कंपन्या वर्प फ्रॉम होम कल्चर स्वीकारण्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत. तर गुगल, फोर्डसारख्या काही कंपन्या हायब्रीड वर्क मॉडेलच्या समर्थनात आहेत.

  Instead of going to the office the employees wants work from home as they are giving the company the option that to resign or not