कोरोना संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी, सेवा 31 ऑगस्टपर्यंत स्थगित

रोना संसर्गाचा विचार करता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर पुन्हा प्रतिबंध आणले आहेत. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही. तसेच कोणतेही विमान भारतात येणार नाही. एविएशन रेग्युलेटर डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशनने याबाबत सर्कुलर जारी केले आहे.

    नवी दिल्ली : कोरोना संसर्गाचा विचार करता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर पुन्हा प्रतिबंध आणले आहेत. 31 ऑगस्ट 2021 पर्यंत भारतातून कोणतेही विमान भारताबाहेर जाणार नाही. तसेच कोणतेही विमान भारतात येणार नाही. एविएशन रेग्युलेटर डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशनने याबाबत सर्कुलर जारी केले आहे.

    दरम्यान DGCA ने निर्णय घेता आहे की, कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अनेक देशांमध्ये वाढला आहे. अमेरिकेत आणि काही युरोपिय देशांमध्ये डेल्टा वेरिएंटचे केसेस सापडल्याने काही देशांनी बाहेरून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. DGCA ने घेतलेल्या निर्णयानुसार आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीवर पूर्णतः निर्बंध घालण्यात आले आहेत.

    परंतु कार्गो फ्लाइट्स आणि त्यांच्या उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता, गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान वाहतूकीवर प्रतिबंद आले होते. त्यानंतर काही अटी शर्थीवर विमान प्रवासाला परवानगी देण्यात आली होती. आता पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा विचार करता. विमान प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत.