आयआरसीटीसीची अफलातुन ऑफर! फक्त ९०० रुपयांत करा दक्षिण भारताची सफर; लवकर जाणून घ्या

कमी खर्चात दक्षिण भारत फिरण्याची सुवर्णसंधी आयआरसीटीसीमुळे उपलब्ध झाली आहे. या १३ दिवसांच्या सहलीत १३ दिवस आणि १२ रात्र असा कालावधी आहे. या सहलीची सुरुवात ३१ मार्च २०२१ रोजी होत आहे. सहलीत सहभागी झालेले सदस्य १२ एप्रिल २०२१ रोजी परत येतील. या १३ दिवसांच्या सहलीसाठी सर्व व्यवस्था आयआरसीटीसी करणार आहे.

    नवी दिल्ली: आयआरसीटीसीच्या नव्या पॅकेजनुसार १३ दिवस दक्षिण भारत फिरता येणार आहे. ही १३ दिवसांची सहल आयआरसीटीसी पॅकेज अंतर्गत आहे. पॅकेजची किंमत १२ हजार २८५ रुपये आहे. यात जीएसटी वगळला तर दिवसाला ९०० रुपये याप्रमाणे सहलीच्या खर्चाचे नियोजन आहे. एवढ्या कमी खर्चात आयआरसीटीसी दक्षिण भारताचे दर्शन घडवणार आहे.

    कमी खर्चात दक्षिण भारत फिरण्याची सुवर्णसंधी आयआरसीटीसीमुळे उपलब्ध झाली आहे. या १३ दिवसांच्या सहलीत १३ दिवस आणि १२ रात्र असा कालावधी आहे. या सहलीची सुरुवात ३१ मार्च २०२१ रोजी होत आहे. सहलीत सहभागी झालेले सदस्य १२ एप्रिल २०२१ रोजी परत येतील. या १३ दिवसांच्या सहलीसाठी सर्व व्यवस्था आयआरसीटीसी करणार आहे. दक्षिण भारत दर्शन घडवणाऱ्या आयआरसीटीसीच्या सहलीत मल्लिकार्जुन, कन्याकुमारी, रामेश्वरम, मदुराई, त्रिवेंद्रम आणि तिरुपती फिरण्याची संधी आहे.

    सहलीची सुरुवात गोरखपुर, देवरिया सदर, बेल्थारा रोड, मऊ, वाराणसी, जौनपुर सिटी, सुल्तानपुर, लखनऊ, कानपुर, झांसी (झाशी) यापैकी कोणत्याही एका स्टेशनवरुन करू शकता. ‘देखा अपना देश’ अंतर्गत आयआरसीटीसी १३ दिवसांच्या सहलीतून दक्षिण भारत दर्शन घडवणार आहे. आयआरसीटीसीच्या १३ दिवसांच्या पॅकेज सहलीत जेवण, रेल्वे भाडे, राहण्याची व्यवस्था, प्रवाशांच्या विमा संरक्षणासाठी तरतूद अशा उपयुक्त सोयीसुविधा आहेत.

    आयआरसीटीसीच्या १३ दिवस आणि १२ रात्रींच्या सहलीसाठी फक्त आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर बुकिंग करता येईल. एकरकमी पूर्ण रक्कम देऊन बुकिंग करावे लागेल. ऑनलाइन पद्धतीने बुकिंग होणार आहे.