दिल्लीतील धौला कुआंमध्ये चकमक, आयएसआयच्या अतिरेक्याला अटक

दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात आयईडी स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या चकमकीनंतर आयएसआयच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत धौला कुआं रिंग रोडं परिसरात चकमक सुरू झाली असून, आयएसआयच्या एका अतिरेक्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात आयईडी स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या चकमकीनंतर आयएसआयच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. अब्दुल युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. आणखी काही लोकांना अटक करण्यात येऊ शकते. असे दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी सांगितले आहे.

अबू युसूफ हा उत्तर प्रदेशातील बलरामपूरचा रहिवाशी असून, दिल्लीत काही साथीदारांसोबत काम करतो. या कारवाईनंतर पोलिसांनी त्याच्या साथीदारांचा शोध घेणं सुरू केलं आहे. अतिरेक्याला अटक करण्यात आल्यानंतर लोधी कॉलनी येथील विशेष पथकाच्या कार्यालयात आणण्यात आलं आहे.