भारतीयांच्या विदेशातील संपत्तीवर आयटीची नजर, स्वतंत्र विभागाची स्थापना

भारताने काही देशांसोबत करार केले असून, संबंधित देशांसोबत काळा पैसा तसेच अघोषित मालमत्तेची माहिती एकमेकांना पुरविण्यात येते. त्यामार्फत बेकायदा जमविलेल्या परदेशी मालमत्तेबाबत बरीच माहिती मिळत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

दिल्ली. भारतीयांच्या विदेशातील संपत्तीवर आता प्राप्तीकर विभागाने (आयकर) (income tax department) नजर रोखली आहे. यासाठी प्राप्तीकर विभागात स्वतंत्र खाते तयार करण्यात आले आहे. भारतीय नागरिकांची परदेशातील अघोषित मालमत्ता तसेच काळा पैसा जमा करण्याच्या प्रकरणांचा या खात्याकडून तपास केला जाणार आहे. प्राप्तिकर खात्याच्या देशभरातील 14 झोनल कार्यालयांतर्गत परकीय मालमत्ता तपास विभाग स्थापन करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिल्यानंतर या विभागासाठी दोन महिन्यांपूर्वीच 69 पदांची भरती करण्यात आली आहे.

‘ब्लॅक मनी’ तपासाला मिळणार गती

भारताने काही देशांसोबत करार केले असून, संबंधित देशांसोबत काळा पैसा तसेच अघोषित मालमत्तेची माहिती एकमेकांना पुरविण्यात येते. त्यामार्फत बेकायदा जमविलेल्या परदेशी मालमत्तेबाबत बरीच माहिती मिळत असल्याचे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मनी लाँड्रिग, दहशतवादाला पैसा पुरविणे तसेच करचोरीला लगाम लावण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून माहिती प्राप्त होते. आता नव्या विभागातून परदेशी मालमत्तेबाबत माहिती मिळणार आहे. त्यामुळे काळ्या पैशासंबंधी प्रकरणांच्या तपासाला गती मिळणार आहे.