indian army

सज्जाद अफगानी(sajjad afgani got killed) हा जैशसाठी (jaish- E mohammad)नव्या तरूणांना भरती करुन त्यांच्या प्रशिक्षणाचे काम बघायचा. भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील धुमश्चक्री अजूनही सुरू आहे.आणखी २ दहशतवादी रावलपोरामधल्या एका घरात लपले असल्याचे समजते.

    जम्मू-काश्मीरच्या शोपियान भागामध्ये भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. शोपियानच्या रावलपोरा गावामध्ये काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तपणे मोहिम आखली. यावेळी भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा जम्मू-काश्मीरमधील कमांडर सज्जाद अफगानी याचा खात्मा करण्यात आला.

    सज्जाद अफगानी हा जैशसाठी नव्या तरूणांना भरती करुन त्यांच्या प्रशिक्षणाचे काम बघायचा. भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमधील धुमश्चक्री अजूनही सुरू आहे.आणखी २ दहशतवादी रावलपोरामधल्या एका घरात लपले असल्याचे समजते.

    दहशतवाद्यांविरोधातली भारतीय सैन्याची मोहिम शनिवारी रावलपोरा भागात सुरू करण्यात आली. मात्र कारवाई करण्यासाठी फौजांनी पावलं उचलल्यावर दहशतवादी लपून बसल्याची माहिती देणारे गावकरी दहशतवाद्यांसोबत अडकले होते. त्यामुळे हे ऑपरेशन थांबवण्यात आलं. गावकऱ्यांना बाहेर काढून मग पुढील कारवाई करण्यात आली.