security forces clash with militants

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहमा येथे अतिरेक्यांच्या उपस्थितीवरून गुरुवारी हा परिसर घेरला गेला आणि शोधमोहीम सुरू केली गेली. ते म्हणाले की, शोध मोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा ( security forces ) दलांशी झालेल्या चकमकीत (clash) शुक्रवारी सकाळी लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba)  दोन अतिरेकी ठार झाले. शुक्रवारी पोलिसांनी ही माहिती दिली.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सिरहमा येथे अतिरेक्यांच्या उपस्थितीवरून गुरुवारी हा परिसर घेरला गेला आणि शोधमोहीम सुरू केली गेली. ते म्हणाले की, शोध मोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सैन्यानेही जवाबी कारवाई केली आणि चकमकीला सुरुवात झाली.


या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी पळ काढू शकणार नाहीत म्हणून रात्री एक जोरदार वेढा घालण्यात आला होता. ते म्हणाले की, शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन एलईटी अतिरेकी ठार झाले. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रे आणि दारूगोळ्यासह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.