jagmohan death

जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन(jagmohan passed away) यांचं काल रात्री उशिरा निधन झालं.

    जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन(jagmohan passed away) यांचं काल रात्री उशिरा निधन झालं. दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.


    आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणतात, “जगमोहनजी यांच्या निधनाने राष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. ते अत्यंत कुशल प्रशासक आणि बुद्धिमान व्यक्ती होते. त्यांनी कायम देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी काम केलं आहे. त्यांच्या आधुनिक आणि कल्पक धोरणांमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मी त्यांच्या परिवाराप्रती आणि त्यांच्या हितचिंतकांप्रती संवेदना व्यक्त करतो.”

    गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा ट्विट करुन जगमोहन यांना श्रद्धांजली वाहिली आहे.