jet airways

जेट एअरवेज कंपनी २०२२ च्या पहिल्या आर्थिक तिमाहीपासून देशांतर्गत(Domestic Flights) उड्डाणे(Jet Airways Will Resume Its Flight Service) सुरू करणार आहे. तसेच कमी अंतराची परदेशी उड्डाणांचे(International Flights) नियोजन करण्यात येणार आहे.

    जेट एअरवेजची(Jet Airways) विमाने लवकरच पुन्हा उड्डाण करणार आहेत.आर्थिक तंगीमुळे जेटने १९ एप्रिल २०१९ पासून उड्डाणे थांबवली होती. मात्र जेट एअरवेज कंपनी २०२२ च्या पहिल्या आर्थिक तिमाहीपासून देशांतर्गत(Domestic Flights) उड्डाणे(Jet Airways Will Resume Its Flight Service) सुरू करणार आहे. तसेच कमी अंतराची परदेशी उड्डाणांचे(International Flights) नियोजन करण्यात येणार आहे. एअरलाइनचे म्हणणे आहे की, ते फ्लाइट स्लॉट आणि इतर समस्यांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेटिंग फ्लाइटसाठी एअर ऑपरेटर प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

    व्यापारी मुरारीलाल जालान हे लंडनस्थित जालान कॉर्लक कन्सोर्टियमचे अग्रणी सदस्य आणि प्रस्तावित जेट एअरवेजचे गैर-कार्यकारी सदस्य आहेत. जालान म्हणाले की, “आम्ही तीन वर्षात ५० हून अधिक विमानांची योजना आखत आहोत, जी ५ वर्षात १०० च्या वर पोहोचेल. समूहाकडे दीर्घकालीन व्यवसाय योजनाही आहे.”

    जालान म्हणाले की, “विमान उद्योगाच्या इतिहासात असे अनेकदा घडले आहे की दोन वर्षांपूर्वी व्यवसाय बंद पडेलेल्या विमान कंपनीचे पुनरुज्जीवन झाले आहे. आम्ही या ऐतिहासिक उड्डाणात सहभागी होण्यासाठी तयार आहोत.”

    कंपनीने सांगितले की जानेवारी ते मार्च २०२२ दरम्यान दिल्ली ते मुंबई दरम्यान त्यांचे पहिले उड्डाण सुरू होईल. कन्सोर्टियम यासाठी देशातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. या प्रक्रियेमध्ये विमानतळावरील स्लॉट वाटप, आवश्यक विमानतळ इन्फ्रा आणि नाईट पार्किंग इत्यादी बाबींचा समावेश आहे. जेटचे नवीन मुख्यालय दिल्ली-गुरुग्राममध्ये असेल. जेटने सुमारे १५० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आणखी १००० कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल. जेटचे पहिले उड्डाण दिल्ली ते मुंबई असेल.