दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी Indian Navy मध्ये नोकरीची संधी, अर्ज कसा करायचा? : जाणून घ्या सविस्तर

भारतीय नौदलात लवकरच मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी सेलर (Sailor) - स्टुअर्ड (Steward) आणि हायजिनिस्ट (Hygienist) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 असणार आहे.

  नवी दिल्ली : भारतीय नौदलात लवकरच मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी सेलर (Sailor) – स्टुअर्ड (Steward) आणि हायजिनिस्ट (Hygienist) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

  या पदांसाठी एकूण 350 जागा रिक्त आहेत. पात्र उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 असणार आहे.

  कोणत्या पदांसाठी भरती होणार

  • शेफ
  • स्टुअर्ड
  • हाईजिनिस्ट
  • एकूण जागा – 350

  शैक्षणिक पात्रता

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार दहावी पास असणं आवश्यक आहे.
  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे,  20 स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि 10 पुश-अप करता येणं आवश्यक आहे.

  ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021