देशसेवेची संधी : कॉन्स्टेबल पदासाठी तब्बल 25 हजारपेक्षा अधिक जागा रिक्त, आजचं करा अर्ज

कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल 25,271 जागांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  नवी दिल्ली : कर्मचारी निवड आयोग महाभरती 2021 अंतर्गत लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल पदासाठी ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर तब्बल 25,271 जागांसाठी हे भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  या पदासाठी भरती

  कॉन्स्टेबल (Constable) – एकूण जागा –  25,271

  शैक्षणिक पात्रता

  या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

  वयोमर्यादा

  या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.