johnson and johnson

अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson & Johnson) भारतातील १२-१७ वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीच्या ट्रायलसाठी(Permission For Covid Vaccine Trial) परवानगी मागितली आहे.

    नवी दिल्ली : भारतात तिसऱ्या लाटेच्या (Third Wave In India) पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच लहान मुलांसाठी लस (Corona Vaccine for Children)देशात येऊ शकते. अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने (Johnson & Johnson) भारतातील १२-१७ वयोगटातील मुलांसाठी कोविड लसीच्या ट्रायलसाठी(Permission For Covid Vaccine Trial) परवानगी मागितली आहे.


    जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या एका निवेदनात असं म्हटलं आहे की, कंपनीनं मंगळवारी अर्ज सादर केला आणि कोरोना लसीची सुविधा जगात एकसमान करण्यासाठी ते वचनबद्ध आहेत. मुलांसाठी लसीची गरज लक्षात घेऊन १७ ऑगस्ट रोजी सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडे अर्ज पाठवला असून १२-१७ वर्षे वयाच्या मुलांसाठी लसीच्या ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे.

    याआधी जॉन्सन अँड जॉन्सनची सिंगल डोस असलेल्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली. भारतात मंजूर होणारी ही पाचवी आणि पहिली सिंगल डोस लस आहे.याआधी सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅसीन, रशियाची स्पुतनिक व्ही आणि मॉडर्ना लसींना देशात वापरासाठी परवानगी मिळाली आहे. कोव्हॅसीन, कोव्हिशिल्ड मॉडर्ना आणि स्पुटनिक – व्ही या चारही डबल-डोस लस आहेत. जॉन्सन अँड जॉन्सनची लस ही सिंगल-डोस लस आहे.