jp nadda and kailash vijaywargiy

भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा(j p nadda) आणि कैलाश विजयवर्गीय(kailash vijaywargiy) यांच्या ताफ्यावर हल्ला(attack on convoy at west bengal) झाला आहे. जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात होते.

पश्चिम बंगालमधील(west bengal) राजकारण आता हिंसक वळणावर आले आहे. भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा(j p nadda) आणि कैलाश विजयवर्गीय(kailash vijaywargiy) यांच्या ताफ्यावर हल्ला(attack on convoy at west bengal) झाला आहे. जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय २०२१ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्या गाड्यांवर हल्ला करण्यात आला. जे पी नड्डा यांच्या ताफ्यातील वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे.

कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला. दगडफेक करण्यात आली आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हल्ल्याचा प्रकार दिसत आहे.

बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. मात्र बंगाल पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली,” असं विजयवर्गीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसकडून या प्रकारावर प्रतिक्रिया देण्यात आली असून पक्षाचे नेते मदन मित्रा यांनी सांगितले की, “त्यांचेच गुंड हिंसाचार करत आहेत”. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. हा सर्वसामान्यांना निषेध होता असं ते म्हणाले आहेत. दुसरीकडे हकीम यांनी भाजपा बाहेरील लोकांना राज्यात आणत असून राज्य सरकारला याची माहितीही देत नसल्याचे म्हटले आहे.