बॅग भरो निकल पडो – जुलैमध्ये ‘इतके’ दिवस नोकरदारांना मिळणार सुट्टी, वाचा Bank Holidaysची संपूर्ण यादी एका क्लिकवर

भटकंतीचे प्लॅन्स प्रत्यक्षात येण्यासाठी जुलै महिना उपयुक्त ठरणार आहे. कारण या महिन्यात नोकरदारांना भरपूर सुट्ट्या (Bank Holidays In July 2021) मिळणार आहेत. 

  मुंबई: कोरोनामुळे अनेकजण घरातून काम करत आहेत. पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांनी फिरायला जाण्याचे प्लॅन्स आखायला सुरुवात केली आहे. भटकंतीचे प्लॅन्स प्रत्यक्षात येण्यासाठी जुलै महिना उपयुक्त ठरणार आहे. कारण या महिन्यात नोकरदारांना भरपूर सुट्ट्या (Bank Holidays In July 2021) मिळणार आहेत.

  या महिन्यात तब्बल 14 सार्वजनिक सुट्ट्या आहेत. यापैकी 7 सुट्ट्या या सणावाराच्या किंवा धार्मिक दिवसांसाठी आहेत. प्रत्येक राज्यातील कर्मचाऱ्यांना या सुट्ट्या मिळतीलच असे नाही. याशिवाय, जुलै महिन्यात विक ऑफ आहेत.

  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमानुसार, आठवडी सुट्टी आणि विविध सणांच्या सुट्टी असे सर्व दिवस मिळून जुलै 2021 महिन्यात केवळ 15 दिवसच(15 Bank Holidays In July) बँका सुरू राहतील. बँक कर्मचाऱ्यांना त्यामुळे तब्बल 15 दिवस सुट्टी मिळणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना आपली बँकेतील कामं या 15 दिवसातच करावी लागणार आहे.

  बँका या दिवशी बंद 
  जुलै महिन्यात रथयात्रा, भानु जयंती, बकरी ईद आणि केर पुजेसारख्या अनेक सुट्टी आहेत. जुलै महिन्यातील पहिलीच सुट्टी 4 जुलै रोजी होती. या दिवशी रविवार होता. यानंतर 10 आणि 11 जुलै रोजी शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद असतील. 12 जुलै रोजी रथ यात्रा उत्सव असणार आहे. ओडिशातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळख असलेल्या या रथयात्राच्या दिवशी तेथील सर्व बँका बंद असतात. दुसरीकडे 13 जुलै रोजी भानु जयंतीमुळे सिक्किममधील बँका बंद राहतील.

  14 जुलै रोजी दुरुकपा तेस्ची सणामुळे सिक्किममधील बँकांना सुट्टी असेल. 16 जुलैला रहेलामुळे उत्तराखंडमधील बँका बंद असतील. 17 जुलैला खर्ची पुजेमुळे त्रिपुरा आणि मणिपूरमधील बँकांना सुट्टी असेल. 18 जुलै रोजी रविवार असल्यानं देशभरातील बँका बंद राहतील. 19 जुलै रोजी गुरु रिम्पोचे थुंगाकरमुळे सिक्किममधील बँकांना सुट्टी असेल.

  बकरी ईद
  बकरी ईदची सुट्टी 20 जुलै रोजी असेल. या दिवशी जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये सुट्टी असते. दुसरीकडे देशातील इतर बहुतांश भागात बकरी ईदची सुट्टी 21 जुलै रोजी असते. त्यामुळे या दिवशी त्रिपुरा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, तमिळनाडु, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, नवी दिल्ली, गोवा आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये बँकांना सुट्टी असेल.

  यानंतर 24 आणि 25 जुलै रोजी आठवडी सुट्टी असल्यानं बँका बंद असतील. 31 जुलै रोजी त्रिपुरामध्ये केरा पूजेमुळे बँका बंद असतील. अशाप्रकारे कोणत्या न कोणत्या प्रकारे देशभरातील बँका तब्बल 15 दिवस बंद असणार आहेत.