Star Pracharak status

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ ( Former Chief Minister Kamal Nath ) यांनी मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी (Madhya Pradesh Minister Imrati Devi) यांना आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केल्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने कमलनाथ यांच्याकडे सोमवारी स्पष्टीकरण मागितलं. आयोगाने हे प्रकरण आवश्यक त्या कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडेही पाठवलं आहे.

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ ( Former Chief Minister Kamal Nath ) यांनी मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी (Madhya Pradesh Minister Imrati Devi) यांना आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केल्यानंतर हा वाद सुरु झाला. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने कमलनाथ यांच्याकडे सोमवारी स्पष्टीकरण मागितलं. आयोगाने हे प्रकरण आवश्यक त्या कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडेही पाठवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ शब्द वापरल्यानंतर हा सगळा वाद सुरु झाला. त्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अखेर माफी मागितली आहे. जर आपलं वक्तव्य कोणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण माफी मागत असल्याचं, ते म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, “जर कोणालाही माझं वक्तव्य अनादर करणारं वाटलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो”.

आयोगाने निवेदनात काय म्हटले ?

कमलनाथ यांनी केलेल्या या बेजबाबदार व अपमानास्पद वक्तव्याबद्दल आयोग त्यांचा तीव्र निषेध करतो. या व्हिडीओमध्ये वापरलेले शब्द बदनामीकारक असून, महिलेच्या प्रतिष्ठेबाबत अनादर व्यक्त करतात, असं आयोगाने एका निवेदनात सांगितले. जास्तीत जास्त महिलांनी राजकाणात यावे असे आम्हाला वाटत असतानाच, एका महिला नेत्याबाबत अशी अनादरकारक शेरेबाजी- तीही अशा महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल-अतिशय दुर्दैवी आहे, असंही या निवेदनात म्हटलं आहे.