‘कंगना राणावत म्हणजे हिमाचलाचे सडलेले सफरचंद’; ‘या’ खासदाराची कंगनावर टीका

बाॅलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत हिने दिल्लीच्या सीमेवर पेटलेल्या शेतकरी आंदोलनावरून आंदोलनकारी शेतकऱ्यांवर खरमरीत टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून काॅंग्रेसच्या खासदाराने कंगणावर विवादित भाषेतील टीकास्त्र डागले. कंगणा म्हणजे हिमालयातील सडलेले सफरचंद आहे, असे ते म्हणाले.

चंदीगढ (Chandighadh). बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने दिल्लीच्या सीमेवर पेटलेल्या शेतकरी आंदोलनावरून आंदोलनकारी शेतकऱ्यांवर खरमरीत टीका केली. याला प्रत्युत्तर म्हणून काॅंग्रेसच्या खासदाराने कंगनावर विवादित भाषेतील टीकास्त्र डागले. कंगणा म्हणजे हिमालयातील सडलेले सफरचंद आहे, असे ते म्हणाले.

पंजाबच्या लुधियानामधील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी ट्विट करत कंगनावर टीका केलीये. या ट्विटमध्ये त्यांनी कंगना राणावतला हिमाचलंच सडलेलं सफरचंद म्हटलंय. खासदार रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, ‘मी कंगणाला सांगू इच्छितो की पंजाबच्या लोकांच्या समस्यांमध्ये आम्ही बाहेरील लोकांना घुसू देत नाही. हिमाचलच्या सडलेल्या सफरचंदाने दूर रहावं.’ रवनीत सिंह बिट्टू यांच्या ट्विटला कंगणा काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.