kangna and uddhav thakre

हरयाणामधील यू-ट्यूबर साहित चौधरीने महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर साहिल चौधरीला अटक करण्यात आले. या प्रकारानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,मुंबईत गुंडाराज सुरू आहे का? जगातील सगळ्यात अकार्यक्षम मुख्यंत्र्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कुणीच प्रश्न विचार नाहीये.

अभिनेत्री कंगना रणौतनं(kangna ranawat) परत एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) व महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मुंबईत गुंडाराज चालू असल्याचा आरोप कंगनानं केेला आहे.तसेच कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री म्हटले आहे. साहिल चौधरीला अटक झाली.त्यानंतर कंगनानं ट्विट केलं आहे. काँग्रेसला प्रश्न विचारले आहेत.

हरयाणामधील यू-ट्यूबर साहित चौधरीने महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. त्यानंतर साहिल चौधरीला अटक करण्यात आले. या प्रकारानंतर कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबईत गुंडाराज सुरू आहे का? जगातील सगळ्यात अकार्यक्षम मुख्यंत्र्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कुणीच प्रश्न विचार नाहीये. ते आमच्यासाठी काय करणार आहेत ? आमचं घर तोडलं आणि आम्हाला मारलं? याचे उत्तर द्यालया कोण बांधील आहे?

साहिलनं महाराष्ट्र सरकारला त्यांच्या कामाबाबत प्रश्न विचारले म्हणून कुणीतरी गुन्हा दाखल केला. प्रश्न विचारणे हा त्याचा लोकशाही अधिकार आहे. साहिलला लगेच तुरूंगात टाकण्यात आलं. मात्र पायल घोषनं अनुराग कश्यपविरोधात  बलात्काराचा गुन्हा दाखल करुन खूप दिवस झाले तरीही तो मुक्तपणे फिरतोय. हे सगळं काय आहे, असा सवाल कंगनाने केला आहे.