केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘कर्मयोगी योजने’ला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये(cabinet meeting) ‘कर्मयोगी योजनेला(mission karmyogi) मंजुरी देण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांसाठी ही योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कर्मचारी आपल्या कामामध्ये सुधारणा करू शकणार आहेत. आपली क्षमता वाढवू शकणार आहेत. केंदीय मंत्री प्रकाश जावडेकर(prakash jawdekar) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे.

 

याआधीच्या बैठकीत सरकारने नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीला मंजुरी दिली होती. आता भरतीनंतरच्या सुधारणा केल्या जात आहेत, असे जावडेकर म्हणाले. ही जगातील सगळ्यात मोठी विकासाची योजना असल्याचेही ते म्हणाले. तसेच मंत्रिमंडळाने नवे विधेयक तयार करण्यासाठीही मंजुरी दिली आहे. या विधेयकामध्ये उर्दू, काश्मिरी, डोगरी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांना जम्मू काश्मीरमध्ये अधिकृत भाषांचा दर्जा मिळणार असल्याचे ते म्हणाले.

शासकीय अधिकाऱ्यांना कर्मयोगी योजनेच्या माध्यमातून भविष्यासाठी सक्षम केले जाणार आहे. पारदर्शक, विकासात्मक आणि सूचीबद्ध काम करण्यासाठी त्यांना तयार केले जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी एक समितीही स्थापन केली जाईल. यात प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल,असे जावडेकर म्हणाले.