काश्मीर पुन्हा दहशतीत, राजौरीत एलओसीजवळ चकमकीत पाच जवानांना वीरमरण, पुंछ, बांदीपोरा, अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचं एन्काऊंटर

जम्मू-कश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसी झालेल्या चकमकीत एका भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासह पाच जवानांना हौतात्म्य मिळाले आहे. पीर पंजाल रेंजमध्ये दहशतवाद्यांशी ही चकमक सुरु होती. या चकमकीत दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलावर जोरदार गोळीबार केला. यात एक ज्युनियर कमीशंड ऑफिसरसहित चार जवानांना वीरमरण आले आहे.

    श्रीनगर : जम्मू-कश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसी झालेल्या चकमकीत एका भारतीय सैन्यदलाच्या अधिकाऱ्यासह पाच जवानांना हौतात्म्य मिळाले आहे. पीर पंजाल रेंजमध्ये दहशतवाद्यांशी ही चकमक सुरु होती. या चकमकीत दहशतवाद्यांनी भारतीय सैन्यदलावर जोरदार गोळीबार केला. यात एक ज्युनियर कमीशंड ऑफिसरसहित चार जवानांना वीरमरण आले आहे.

    तर या गोळीबारात ३ ते ४ जवान जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सैन्याच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दहसतवाद्यांशी लढण्यासाठी बॅकअप फोर्सही पाठविण्यात आला आहे. या परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच, भारतीय सैन्यदलाने सोमवारी पहाटेच्या सुमारास या परिसरात ऑपरेशन सुरु केले. या परिसरात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा घेईन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्यदलाला मिळाली होती. सैन्याकडून सर्च ऑपरेशन करण्यात येत असतानाच, दहशतवाद्यांनी गोळीबार केला, यात एक जेसीओसहित पाच जवान गंभीर जखमी झाले होते. काही वेळाने पाचही जणांना वीरमरण आले.

    दुसरीकडे शोपिया जिल्ह्यांतही सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. तुलरान परिसरातही चकमक झाल्याची माहिती आहे. गेल्या २४ तासांत काश्मीर खोऱ्यात चार ठिकाणी दहशतवादी आणि सैन्यदलात चकमकी झाल्या आहेत.