kerala government imparts snake catcher training jails and fine for 7 years for unlicensed snake catchers

दुसऱ्या टप्प्यात अशा लोकांना प्रशिक्षण दिलं आहे ज्यांना साप पकडण्याची आवड आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५३८ जण या प्रशिक्षणात सहभागी झाले, यापैकी ३१८ जणांना परवाना देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ६२० जण प्रशिक्षणात सहभागी झाले आणि ५०२ जणांना परवाना देण्यात आला. ज्या लोकांना परवाना देण्यात आला आहे, त्यात ३५ महिला आहेत. यात २३ वनविभागाचे कर्मचारी आहेत, तर १२ जण सर्वसामान्य आहेत. संपूर्ण राज्यात २३ ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

  • भारतात साप चावल्याने चारपैकी दोन जणांचा मृत्यू होतो तर एक पूर्णपणे अपंग होतो
  • गेल्या ३ वर्षात केरळमध्ये ३३४ जणांचा मृत्यू साप चावल्याने झाला, १८६० जणांचा जीव वाचलाय

केरळमध्ये आता साप पकडण्यासाठी परवाना असणं अत्यावश्यक केलं आहे. केरळच्या वन आणि वन्यजीव विभागाच्या वतीने प्रशिक्षण आणि परवाना घेतल्याशिवाय साप पकडल्यास सात वर्षांची कैद आणि दंड ठोठावणार असल्याचा फतवा काढलाय. हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे.

एका साप पकडणाऱ्याचा झालेला मृत्यू, कोबराचा वापर करून एकाची केलेली हत्या आणि एका शाळेत साप चावल्याने एका मुलाचा झालेला मृत्यू अशा घटना घडल्यानंतर वनविभागाने हे पाऊल उचललं आहे. प्रशिक्षण दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, ज्यात वॉचरपासून ते एसीएफ पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात अशा लोकांना प्रशिक्षण दिलं आहे ज्यांना साप पकडण्याची आवड आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ५३८ जण या प्रशिक्षणात सहभागी झाले, यापैकी ३१८ जणांना परवाना देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात ६२० जण प्रशिक्षणात सहभागी झाले आणि ५०२ जणांना परवाना देण्यात आला.

ज्या लोकांना परवाना देण्यात आला आहे, त्यात ३५ महिला आहेत. यात २३ वनविभागाचे कर्मचारी आहेत, तर १२ जण सर्वसामान्य आहेत. संपूर्ण राज्यात २३ ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रभाग अधिकारी आणि सहाय्यक संरक्षक वन (एसीएफ) मोहम्मद अन्वर म्हणाले, हा फक्त प्रशिक्षण कार्यक्रम नसून सर्पदंश रोखण्याचा प्रकल्प आहे, जो आमच्या वन विभागाने सुरू केला आहे. आम्ही अशा लोकांची यादी करणार आहोत ज्यांना परवाना दिला आहे आणि आमच्या मोबाइल ॲप ‘सर्प’च्या माध्यमातून साप पकडण्यासाठी यांची मदत घेऊ शकता. आपत्कालिन परिस्थितीत ॲप सर्वाधिक जवळचे रुग्णालय आणि साप पकडणाऱ्याची माहिती देईल. या ॲपमध्ये या रुग्णालयांची यादीही देण्यात आली आहे, या ठिकाणी साप चावल्यानंतर देण्यात येणारी औषधे उपलब्ध असतील.

साप चावण्यापासून रोखण्याचा कार्यक्रम हा अशासाठी महत्त्वाचा आहे कारण भारतात १२ लाख जणांचा मृत्यू सर्पदंशाने झाला आहे. भारतात सर्पदंश झाल्याने चारपैकी २ जणांचा मृत्यू तर एकाला पूर्णपणे अपंगत्व येतं. भारतातील सरासरी संर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केरळमध्ये त्या तुलनेत खूपच कमी आहे.

गेल्या तीन वर्षांत केरळमध्ये ३३४ जणांचा मृत्यू सर्पदंशाने झाला असून उपचारानंतर १८६० जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. या प्रकल्पाचा उद्देश सर्पदंशाची संख्या कमी करणं हा आहे. मोहम्मद अन्वर म्हणतात, या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश साप पकडणाऱ्यांचा आणि सापांचा जीव वाचविणे आहे.

सापांना चुकीच्या पद्धतीने पकडल्याने त्यानांही इजा होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ज्या सापांना डोक्याच्या बाजूने पकडण्यात येतं किंवा तोंड दाबण्यात येतं, त्यानंतर त्यांना इजा होते. प्राण वाचल्यानंतर जंगलात सोडण्यात येणारे अशाप्रकारचे हे साप फार काळ जिवंत रहात नाहीत.

अशाप्रकारे असुरक्षितपणे सापांना पकडणं, पकडणाऱ्यांसाठीही धोक्याचे असते. म्हणूनच वनविभाग नियमावली तयार करण्याचा विचारात होता. एखाद्याची हत्या करण्यासाठी सापांच्या होणाऱ्या वापरावरही प्रभाव पडणार आहे असं मोहम्मद अनवर यांनी स्पष्ट केलं.
आता केंद्र सरकारचा पर्यावरण विभाग हा निर्णय अन्य राज्यातही लागू करण्याच्या विचारात आहे. याच दरम्यान केरळचे नामवंत सर्पमित्र बाबा सुरेश यांनी साप पकडण्यासाठी परवाना आवश्यक असल्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. वन विभागाचा हा निर्णय आमच्यावर टाच आणण्यासाठीच घेतला गेला आहे असं सुरेश यांनी सांगितलं.

मी साप पकडण्याचं प्रशिक्षण तर घेणारच नाही आणि परवान्यासाठी अर्जही करणार नाही. मला जर कोणी साप पकडण्यासाठी बोलवलं तर मी निश्चितच त्या ठिकाणी जाईन. सुरेश यांनी आपणहून साप पकडण्यात मास्टरी प्राप्त केली आहे आणि आजवर त्यांनी साठ हजारांहून अधिक सापांना जीवदान दिले आहे. यात २०१ किंग कोबरा जातींच्या सापांचा समावेश आहे. त्यांनी आजवर दहा हजारांहून अधिक लोकांना साप पकडण्याविषयी माहिती दिलेली आहे.

मी अनेकदा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित केलं आहे. मी वनविभागाशी समन्वय राखूनच आपली मोफत सेवा लोकांना देत आहे. आता विभागातील आणि विभागाबाहेरील लोकं माझ्या विरोधात गेली आहेत असं सुरेश यांनी स्पष्ट केलं.