पुलवामातील चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ज्या ठिकाणी चकमक झाली त्या ठिकाणाहून जवानांनी एके-४७ आणि हॅण्डग्रेनेड असा घातपात घडवणारा शस्रसाठा हस्तगत केला आहे.

पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा येथे आज बुधवारी पहाटेच्या सुमारास भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना घेरले आणि चकमकीस सुरूवात झाली. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मात्र या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच ज्या ठिकाणी चकमक झाली त्या ठिकाणाहून जवानांनी एके-४७ आणि हॅण्डग्रेनेड अशा प्रकारचे घातपात घडविणारे शस्त्रसाठा जवानांनी हस्तगत केले आहेत.

दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीच्या उल्लंघनाबरोबरच घुसखोरीचे देखील प्रयत्न केले जात आहेत. २९ जुलै रोजी राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. त्यावेळी दोन पाकिस्तानी घुसखोरांचा खात्मा देखील करण्यात आला होता. तसेच पाकिस्तानकडून एलओसीवर कुरापती करणे सुरूच आहेत. परंतु या सगळ्यांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.