२ झोन, ७ सेक्टरमध्ये कुंभमेळा ; प्रशासनाकडून दिशानिर्देश जारी

लखनौ : वृंदावनमध्ये १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. प्रशासनाकडून कुंभमेळ्याचे दोन झोन आणि ७ सेक्टरमध्ये विभाजन केले आहे. सुमारे, ५६ हेक्टर जागेवर वसलेल्या कुंभमेळ्यातील प्रत्येक झोन आणि सेक्टरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह मूलभूत सुविधा उपलब्ध असतील

लखनौ : वृंदावनमध्ये १६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. प्रशासनाकडून कुंभमेळ्याचे दोन झोन आणि ७ सेक्टरमध्ये विभाजन केले आहे. सुमारे, ५६ हेक्टर जागेवर वसलेल्या कुंभमेळ्यातील प्रत्येक झोन आणि सेक्टरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्थेसह मूलभूत सुविधा उपलब्ध असतील. पहिल्या झोनमध्ये कुंभमेळ्यातील अंतर्गत भागासह यमुना किनाऱ्यावरील घाट येतील. तर, दुसर्‍या झोनमध्ये कुंभमेळा क्षेत्राच्या बाहेरील भागांचा समावेश करण्यात आला आहे.

लखनौमधील सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा प्रशासनाने कुंभमेळ्याच्या तयारीत कोणतीही निष्काळजीपणा सहन करणार नाही. मेळ्याच्या पुस्तकात दिल्यानुसार झोन आणि सेक्टरनुसार सुरक्षा व्यवस्थेपासून अन्य बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे.

पहिल्या झोनमध्ये काय?
पहिल्या झोनमध्ये ३ सेक्टर आहेत. त्याअंतर्गत यमुना आरती घाट, केशीघाट, परिक्रमा मार्ग मोक्षधामपर्यंतचा परिसर सेक्टर १ मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. सेक्टर २ मध्ये मोक्षधाम ते परिक्रमा मार्ग, जगन्नाथ मंदिरासमोर मेळाक्षेत्र. जगन्नाथघाट ते देवराह बाबा रोड या संपूर्ण क्षेत्राचा समावेश सेक्टर तीनमध्ये करण्यात आला आहे.

दुसऱ्या झोनमध्ये काय?
दुसर्‍या झोनमध्ये ४ सेक्टरचा समावेश आहे. यामध्ये सेक्टर ४ मधील पंतून पुलावरील देवोराह बाबा आश्रम, डांगोली तिराहा येथील पनोली गावाचा समावेश आहे. सेक्टर पाच मध्ये जगन्नाथ मंदिर ते परिक्रमा मार्ग, अटल्ला चंगी, हनुमान मंदिर तिराहा, नगरपालिका चौक, सौ शैया तिराहा, अद्धा पोलिस चौकी, मथुरा मार्ग, फल मंडी, पानीघाट तिराहा ते पक्क्या पुलापर्यंतचा परिसर आहे. सेक्टर सहा मध्ये यमुना पक्क्या पुलावरून पानीगाव तिराहा ते यमुना एक्सप्रेस वे, यमुना एक्सप्रेस वे ते दुधाधारी गेट राया कट, यमुनापर परिसर, देहसारा गेट ते वृंदावन रोड समावेश आहे. सेक्टर सात मध्ये सौ फुटा रोड, पापरी स्क्वेअर, प्रेम मंदिर, रामानरती, इस्कान मंदिर, विद्यापीठ चौक, गौतमपाडा ते नगर पालिका चौक, नगरपालिका चौक ते अटल्ला चुंगी, जादौन पार्किंग ते चिरघाट, बांकेबिहारी मंदिरातून छटीकरा रोड, रुक्मिणी विहार, सुनार रोड रोडपर्यंत ठेवण्यात आले आहे.