डॉक्टर महिलेच्या मित्राने आधी तिच्यावरच केला बलात्कार, नंतर तयार केले अश्लील व्हिडिओ; पुढे काय झालं जाणून घ्या सविस्तर

तिच्या मित्राने एमपी नगर आणि पिपलानी भागातील हॉटेलमध्ये तिच्यासोबत बलात्कार केला. यावेळी त्याने व्हिडिओ सुद्धा तयार केला. यानंतर हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने जवळपास दीड लाख रुपयेही या महिलेकडून घेतले.

  भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका महिला डॉक्टरने आपल्या मित्राविरोधात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल केला आहे. मित्राने आधी तिच्यासोबत अश्लील कृत्य केले, त्यानंतर याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैसेही काढून घेतले, असा या डॉक्टर महिलेचा आरोप आहे.

  यासंदर्भात अधिक माहिती देताना भोपाळच्या पिपलानी पोलीस ठाण्याचे चैनसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, बुधवारी २४ वर्षीय एमबीबीएस डॉक्टर महिलाने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या मित्राने एमपी नगर आणि पिपलानी भागातील हॉटेलमध्ये तिच्यासोबत बलात्कार केला. यावेळी त्याने व्हिडिओ सुद्धा तयार केला. यानंतर हा अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने जवळपास दीड लाख रुपयेही या महिलेकडून घेतले. यानंतरही आरोपीने महिलेचा अश्लिल व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची दोन वर्षांपूर्वी आरोपी युवकासोबत मैत्री झाली होती. दोघेही मैत्रीनंतर बरेच दिवस एकमेकांशी बोलत होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये आरोपीने महिलेला एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी बोलावले आणि त्याठिकाणी तिच्यासोबत बलात्कार केला आणि व्हिडिओ तयार केला. यानंतर आरोपीने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून जवळपास दीड लाख रुपये घेतले.

  पीडित महिलेने केलेल्या आरोपाच्या आधारे आरोपीच्या बँक अकाऊंट डिटेल्स तपासले जात आहेत. पीआयच्या म्हणण्यानुसार आरोपी युवक इंदूरचा रहिवासी आहे. सध्या आरोपीविरोधात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीतून पैसे काढल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल करता येऊ शकतात.

  तुम्हाला या बातमीबाबत काय वाटतं ? बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

  lady doctor friend rape video social media case in madhya pradesh