दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ, लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता

लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा सुद्धा आता वाढू लागला आहे. दिल्लीत गेल्या सहा दिवसांपासून लॉकडाऊन असूनही मृतांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. कोरोना रुग्ण वाढीचा दर वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारकडून लॉकडाऊन वाढविला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

    नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने (Delhi Government) राजधानीत एक आठवड्यासाठी लॉकडाऊन (Lockdown) जाहीर होता. या लॉकडाऊनचा कालावधी आज संपणार आहे. दरम्यान, कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता सरकार पुन्हा एका आठवड्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यावर विचार करीत आहे.

    लॉकडाऊनचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढविला जाऊ शकतो. गेल्या काही दिवसांत दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा सुद्धा आता वाढू लागला आहे. दिल्लीत गेल्या सहा दिवसांपासून लॉकडाऊन असूनही मृतांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. कोरोना रुग्ण वाढीचा दर वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत दिल्ली सरकारकडून लॉकडाऊन वाढविला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे.

    दिल्लीतील कोरोना परिस्थिती जी अनियंत्रित होत आहे आणि कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरेशा सुविधा नसल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नाहीत. दिल्लीतील मागणीच्या तुलनेत फारच कमी ऑक्सिजन उपलब्ध आहे, ज्यामुळे रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे.