मुलीच्या लग्नाची चिंता मिटवणारी LIC ची ‘कन्यादान’ पॉलिसी

गुंतवणूकीसाठीच LIC ने कन्यादान पॉलिसी योजना

नवी दिल्ली: मुलीच्या जन्मापासूनच तिच्या भविष्याची आई- वडिलांना सतावत असते. मात्र आता मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तिच्या जन्मापासूनच गुंतवणूक करण्याला पालकांकडून प्राधान्य दिली जात आहे. या (LIC Kanyadan Policy) सुरू केली आहे. या योजनेमध्ये दररोज १२१ रुपयांची बचत अर्थात महिन्याला ३६०० रुपयांचा प्रीमियम भरून तुम्ही ही योजना खरेदी करू शकता. यापेक्षी कमी किंवा यापेक्षा जास्त किंमतीचा प्रीमियमही तुम्ही खरेदी करता येतील.

१२१ रुपयांच्या हिशोबाने तुम्ही जर या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर २५ वर्षानंतर तुम्हाला २७ लाख रुपये मिळतील. याशिवाय पॉलिसी खरेदी केल्यानंतर मृत्यू झाल्यास कुटुंबाला या पॉलिसीचा प्रीमयम भरावा लागणार नाही, वार्षिक १ लाख रुपये मिळतील. याशिवाय २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॉलिसीच्या नॉमिनीला २७ लाख रुपयेही मिळतील.

ही पॉलीसी खरेदी करणाऱ्याचे वय कमीतकमी ३० वर्षे तर मुलीचं वय १ वर्षं असणं आवश्यक आहे. ही योजना २५ वर्षाची असली तरी, प्रीमियम २२ वर्षांसाठी द्यावा लागेल. मात्र तुमच्या मुलीच्या वयाच्या मानाने वेगवेगळ्या पद्धतीने ही पॉलिसी खरेदी करता येते. मुलीच्या वयानुसार या पॉलिसीचा कालावधी निश्चित केला जातो.