अनलॉक – ४ मध्ये ‘या’ गोष्टी सुरू होण्याची शक्यता ?

सध्या देशात शाळा, मेट्रो रेल्वे सेवा, चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार,ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल, शैक्षणिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारच्या गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लावण्यात आला आहे. परंतु यापैकी काही गोष्टी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

देशात येत्या ३१ ऑगस्टला अनलॉक – ३ संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता पुढील काळात अनलॉक – ४ ची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून फक्त निर्बंध असलेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, असे म्हटले जात आहे. सध्या देशात शाळा, मेट्रो रेल्वे सेवा, चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, थिएटर, बार,ऑडिटोरियम, असेंब्ली हॉल, शैक्षणिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारच्या गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध लावण्यात आला आहे. परंतु यापैकी काही गोष्टी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

दिल्लीमध्ये १ सप्टेंबरपासून मेट्रो सुरू करण्यास परवानगी मिळण्याची शक्यता आहे. परंतु केंद्र सरकारकडून शाळा सुरू करण्याचा विचार अद्यापही झालेला नाही. मात्र, देशातील काही राज्ये उच्च शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा सल्ला देत आहेत. आयआयटी, आयआयएमसह सर्व कॉलेज आणि विद्यापीठे दिवाळीपूर्वी कदाचित सुरू होतील. मात्र शाळा सुरू होणार की नाही, यामध्ये शंका असून जवळपास अशक्य असल्याचे वाटत आहे. तसेच राज्य सरकार सुद्धा अनलॉक – ४ बाबत कोणती भूमिका घेणार आहे. हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.