liquor recovered from rivers in punjab Even the police are ignoring it
या राज्यात वाहतायेत दारुच्या नद्या; पोलिसही चिरीमिरी घेऊन करतायत दुर्लक्ष

जेव्हा या ठिकाणी पोलीस छापे घालण्यासाठी येतात तेव्हा त्यांना हफ्ते दिले जातात. त्यातून हे तस्कर आपले सामान सोडवून घेतात आणि या ठिकाणाहून आपला मुक्काम हलवतात. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांना अनेकदा हात हलवत माघारी फिरावे लागते.

पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेवर सतलज आणि बियास नद्यांमध्ये पाण्याऐवजी वाहतेय कच्ची दारू. जुलै- ऑगस्टमध्ये पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने शंभरहून अधिक जणांना आपाला जीव गमवावा लागला आहे. यानंतर उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी या संपूर्ण भागात शोधमोहीम राबविली. या मोहिमेत सतलज आणि बियास नदीपात्रातून जवळपास साडेपाच लाख लीटरहून अधिक कच्च्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे.

सतलज-बियास संगमापासून तयार झालेल्या हरिके पाटण तलावातून उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कच्च्या दारूचा साठा हस्तगत केला आहे. दारू तस्करांनी हफ्ते देण्यास सुरुवात केली आहे. जेव्हा या ठिकाणी पोलीस छापे घालण्यासाठी येतात तेव्हा त्यांना हफ्ते दिले जातात. त्यातून हे तस्कर आपले सामान सोडवून घेतात आणि या ठिकाणाहून आपला मुक्काम हलवतात. या सगळ्या प्रकारामुळे पोलिसांना अनेकदा हात हलवत माघारी फिरावे लागते.

दारू तस्कर प्लास्टिच्या लिफाफ्यात कच्ची दारू भरून त्याची पाकिटे तयार करतात आणि वीस रुपयाच्या हिशेबाने ती विकतात. जुलै-ऑगस्ट महिन्यात अमृतसर,तरनतारन आणि बटाला येथे विषारी दारू प्यायल्याने शंभर जणांचा मृत्यू झाल्यानंतर फिरोजपूर जिल्ह्यात साडेपाच लाख लीटर कच्च्या दारूचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे, तथापि यापूर्वी पोलिसांनी कधीच एवढ्या प्रमाणात कच्ची दारू जप्त केलेली नाही.

उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी दररोज छापेमारी करून कच्ची दारू जप्त करत आहेत. फिरोजपूरच्या सीमेवरील गावांतील हबीबके, अलीके आणि झुग्गे निहंगां येथून जवळच वाहणाऱ्या नद्यांच्या आजूबाजूला असलेल्या पाण्याच्या टाक्यांमधून कच्च्या दारूचा अवैध साठा जप्त करण्यात येत आहे. फिरोजपूरमध्ये कच्ची दारू तयार करण्यात सीमेवरील गावांपैकी अलीके व हबीबके बदनामीत आघाडीवर आहेत.

उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त मोहिमेत जुलैमध्ये जवळपास ५८ हजार लीटर कच्ची दारू, ऑगस्टमध्ये जवळपास २९ हजार लीटर, सप्टेंबरमध्ये ३५ हजार लीटर, ऑक्टोबरमध्ये दोन लाख ५० हजार लीटर, नोव्हेंबरमध्ये ८१ हजार लीटर आणि डिसेंबरमध्ये आजवर २३ हजार लीटर कच्ची दारू जप्त करण्यात आली आहे.