narendra modi

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. भारतात सध्या १७ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याचे आधी घोषित करण्यात आले होते. हा

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशभरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. भारतात सध्या १७ मे पर्यंत लॉकडाऊन असल्याचे आधी घोषित करण्यात आले होते. हा लॉकडाऊनचा तिसरा टप्पा होता. मात्र आता १८ मे पासून पुढेही लॉकडाऊन असणार आहे, असे मोदी यांनी सांगितले. या लॉकडाऊनमध्ये काही नियम बदलतील, असे संकेतही त्यांनी दिले. त्याची माहिती १८ मे च्या आधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच स्वदेशी आणि स्थानिक उत्पादनेच भारतीयांनी खरेदी करावी. लोकल प्रोडक्टला ग्लोबल बनवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.