गॅस सिलिंडरचा भडका: सबसिडीवाला गॅस सिलेंडरही ९०० रुपये पार, २ महिन्यांत ७५ रुपयांहूनही झाला अधिक महाग

अनुदानित एलपीजीच्या किमतीत १ जानेवारीपासून एकूण सिलिंडरमध्ये १९० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो अनुदानित सिलिंडरची किंमत आता कोलकातामध्ये ९११ रुपये, मुंबईत ८८४.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९००.५० रुपये आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी रद्द केली आहे.

  नवी दिल्ली : घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या (LPG) किंमतीत सलग तिसऱ्या महिन्यात वाढ (Price Hike) करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (Oil PSUs) एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत १० रुपयांनी वाढ केली आहे. दिल्लीत अनुदानित १४.२ किलो सिलेंडरची किंमत आता ८८४.५० रुपयांवर गेली आहे. पूर्वी राजधानीत सिलेंडर ८५९.२० रुपये होते. १ जुलैपासून सिलेंडरच्या किमतीत ७५.५० रुपयांची वाढ झाली आहे. जुलैमध्ये त्याची किंमत २५.५० रुपयांनी आणि ऑगस्टमध्ये २५ रुपयांनी वाढली होती.

  अनुदानित एलपीजीच्या किमतीत १ जानेवारीपासून एकूण सिलेंडरमध्ये १९० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो अनुदानित सिलेंडरची किंमत आता कोलकातामध्ये ९११ रुपये, मुंबईत ८८४.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९००.५० रुपये आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी रद्द केली आहे. घरगुती एलपीजीची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. १ मार्च २०१४ रोजी घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत ४१०.५ रुपये प्रति सिलेंडर (१४.२ किलो) होती.

  सातत्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ केल्याने सर्वसामान्यांना महागाईच्या खाईत लोटण्याचा केंद्र सरकारचा हा निर्णय योग्य आहे असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...
  महिना दिल्ली कोलकाता मुंबई चेन्नई
  १ सप्टेंबर २०२१ ८८४.५ ९११ ८८४.५ ९००.५
  १८ ऑगस्ट २०२१ ८५९.५ ८८६ ८५९.५ ८७५
  १ ऑगस्ट २०२१ ८३४.५ ८६१ ८३४.५ ८५०
  १ जुलै २०२१ ८३४.५ ८६१ ८३४.५ ८५०
  १ जून २०२१ ८०९ ८३५.५ ८०९ ८२५
  १ मे २०२१ ८०९ ८३५.५ ८०९ ८२५
  १ एप्रिल २०२१ ८०९ ८३५.५ ८०९ ८२५

  कधी किती वाढली किंमत

  दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, सर्व सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमती कमी करायच्या, वाढवायच्या की नाही हे ठरवतात. यापूर्वी १ मे रोजी गॅस कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. तेल कंपन्यांनी एप्रिलमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीत १० रुपयांची कपात केली होती. त्याआधी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये एलपीजी सिलेंडर महाग झाले.