पीएम केअर्स फंडातील कोट्यवधी रुपयांचा पैसा कुठे गेला? ममता बॅनर्जींचा मोदी सरकारला सवाल

कोरोनाच्या (Corona) काळात नागरिकांकडून गोळा केलेला पीएम केअर्स फंडमधील (PM Cares Fund) पैसा कुठे गेला? असा सवाल त्यांनी केला आहे. एकप्रकारे ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर हल्लाबोल (Attack) केला आहे.

नवी दिल्ली : देशातील संघराज्याचा ढाचा उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) विविध सरकारी यंत्रणांचा उपयोग केला असा आरोप ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)  यांनी मंगळवारी केला आहे. यासोबतच कोरोनाच्या (Corona) काळात नागरिकांकडून गोळा केलेला पीएम केअर्स फंडमधील (PM Cares Fund) पैसा कुठे गेला? असा सवाल त्यांनी केला आहे. एकप्रकारे ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर हल्लाबोल (Attack) केला आहे.

कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जींना विचारले प्रश्न

पीएम केअर्स फंडातील सर्व पैसे कुठे गेले? या मदतीचे भवितव्य काय आहे ते कोणाला माहिती आहे की नाही? कोट्यवधी रुपयांचा पैसा कुठे गेला, त्याचा हिशेब सादर का गेला नाही, केंद्र सरकार राज्य सरकारला सल्ले देतं. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने काय केलं याबाबत कोणीही बोलत नाही. असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्याचा दावा ममता बॅनर्जी यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून राज्यात फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या राजकारणाला जोर आला आहे. गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्तेवर असलेल्या ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला फुटीचे ग्रहण लागले असून, काही बड्या नेत्यांसह अनेक आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. त्यातच आता ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारबाबतही अनेक दावे केले जात आहेत.