जे विरोधकांच्या संपर्कात ते पक्ष सोडण्यासाठी आहेत मोकाट, ममता बॅनर्जींचा इशारा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांनी कालीघाटमध्ये पक्षाची एक बैठक(trunmul congress meeting) घेतली. या बैठकीत ममता यांनी पक्षविरोधात होणाऱ्या कारवायांबाबत कठोर शब्दात इशारा दिला. तसेच विरोधकांच्या संपर्कात असेलेले लोक पक्ष सोडण्यास मुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांनी कालीघाटमध्ये पक्षाची(trunmul congress meeting) एक बैठक घेतली. तीन तास चाललेल्या या बैठकीत निवडणुकांच्या तयारीविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीत ममता यांनी पक्षविरोधात होणाऱ्या कारवायांबाबत कठोर शब्दात इशारा दिला. तसेच विरोधकांच्या संपर्कात असेलेले लोक पक्ष सोडण्यास मुक्त असल्याचे ममतांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र त्यांचा इशारा हा मंत्रिमंडळातून राजीनामा देणारे नेते शुभेंदु अधिकारी आणि पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या काही अन्य आमदारांबद्दल होता. जर एक नेता पक्षातून बाहेर पडला तर त्यांच्यासारखे एक लाख नेते आपण तयार करू शकतो असे ममता बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी शुभेंदु अधिकारी यांचे वडील आणि पुरबा मेदिनीपुर टिएमसी प्रमुख तसंच कांथी येथील खासदार शिशीर अधिकारी यांच्याशीही चर्चा केली. पक्षविरोधी कारवाया आणि जिल्हा स्तरावरील विरोध संपवण्यास सांगितलं. शिशीर अधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालणार असल्याचं आश्वासन दिल्याचं एका नेत्यानं सांगितलं.या बैठकीदरम्यान ममता बॅनर्जी यांनी उत्तर भारतात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचेही स्पष्ट केले.

टीएमसीच्या शेतकरी संघटनांना ८ डिसेंबर रोजी कृषी कायद्यांविरोधात मध्य कोलाकातातील महात्मा गांधी यांच्या प्रतीमेसमोर तीन दिवसीय आंदोलन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.