ममता बॅनर्जी यांचे संथाली नृत्य ; निवडणूक प्रचारात केलेला डान्स एकदा पहाच

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी पश्चिम बंगाल दौरा केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीकास्र सोडले. भाजप नेत्यांच्या दौऱ्यावेळी काही नेत्यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये वातावरण थोडं गंभीर बनलं आहे. मात्र यातच आता ममता बॅनर्जी एका संगीत कार्यक्रमात हसत खेळत उत्साहाने सहभागी झाल्याच्या दिसल्या. लोक कलाकारांच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी प्रसिद्ध संथाली नृत्यांगना बसंती हेंब्रमसोबत डान्स केला. ममता बॅनर्जी यांनी कार्यक्रमामध्ये काही लोककलाकारांचा सन्मान केला. यामध्ये संगीतकार, गायक आणि डान्सर यांचा समावेश होता. कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी संथाली डान्सर बसंती हेंब्रम यांनाही पुरस्कार दिला. यावेळी ममतांनी बसंतीसोबत डान्ससुद्धा केला. हेंब्रम यांनी ममता बॅनर्जींना डान्स स्टेप्स शिकवल्या.

बंगालचा गुजरात होऊ देणार नाही

राष्ट्रगीत आणि जय हिंदचा नारा पश्चिम बंगालमधून देण्यात आला. बंगाल सर्वोकृष्टतेला महत्त्व देतो. आम्ही बंगालला गुजरातसारखं करण्याची सहमती देऊ शकत नाही. बंगालची भूमी जीवना स्त्रोत आहे. आपल्याला ही भूमी सुरक्षित ठेवावी लागेल. आपल्याला याचा अभिमान बाळगावा लागेल. बाहेरून येणाऱ्यांनी म्हणावे की, ही भूमी गुजरातसारखीच होऊन जाईल, असे व्हायला नको. आमचा हाच संदेश आहे की, आम्ही सगळ्यांसाठीच आहोत. मानवता सगळ्यांसाठीच आहे. मग तो शीख असो, जैन असो वा ख्रिश्चन. आम्ही त्यांच्यामते फूट पाडण्याची परवानगी देणार नाही, असे म्हणत ममतांनी भाजपावर टीका केली.

अर्थसंकल्पात वाटणार खैरात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवर भाजपाने लक्ष्य निर्धारित केले असून राज्यातून तृणमूल काँग्रेसचे सरकार हटविण्यासाठी केंद्र सरकार पूर्णत: जोर लावत आहे. केंद्राने राज्यातील अनेक प्रकल्पांसाठी निधीही जाहीर केला आहे. स्मार्ट सिटीपासून ग्रामीण रस्त्यांपर्यंत योजनांची बरसात केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार गेल्या पाच वर्षात बंगालला जारी केलेल्या बजेटवर एक रिपोर्ट कार्ड तयार करीत आहे. आगामी अर्थसंकल्पातही बंगालमधील विविध योजनांवर खैरात केली जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली.