धक्कादायक प्रकार – असं काय घडलं की त्याने मित्राचा आणि गर्लफ्रेंडचा घेतला जीव

उत्तर प्रदेशातील(uttar pradesh) झाशीमध्ये शुक्रवारी एका युवकाने रागाच्या भरात भयानक प्रकार केला आहे. या युवकाने त्याच्या मित्राला वर्गात गोळी(shot dead) घातली. इतक्यावरच तो थांबला नाही तर नंतर त्याने गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तिला(killing) ठार मारले.

    झाशी: उत्तर प्रदेशातील(uttar pradesh) झाशीमध्ये शुक्रवारी एका युवकाने रागाच्या भरात भयानक प्रकार केला आहे. या युवकाने त्याच्या मित्राला वर्गात गोळी(shot dead) घातली. इतक्यावरच तो थांबला नाही तर नंतर त्याने गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन तिला(killing) ठार मारले.

    मृत्यू झालेेल्या मुलीचे नाव कृतिका त्रिवेदी आहे. तर जखमी विद्यार्थ्याचे नाव हुकमेंद्र सिंग गुर्जर असे आहे.  आरोपी मंथन सिंग सेंगरने एका मुलीशी असलेल्या रिलेशनशिपवरून झालेल्या वादातून ही भयानक घटना घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

    आरोपी आणि मृत विद्यार्थिनी हे ४ वर्षांपासून जवळचे मित्र होते. मात्र कृतिका, हुकमेंद्र आणि मंथन या तिघांच्या मैत्रीत नात्याच्या मुद्द्यावर कटुता आली. मंथनला समजले की, हुकमेंद्र कृतिकासोबतच्या त्याच्या संबंधांबद्दल अफवा पसरवत आहे. त्यामुळे त्याने मित्रावर गोळी झाडली.

    हुकमेंद्र या विद्यार्थ्याला उपचारासाठी दिल्ली येथे हलविण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी विद्यार्थी मंथनने पिस्तूल घेऊन वर्गात प्रवेश केला आणि हुकमेंद्रला डोक्यावर गोळी घातली. मंथनने मग कॉलेजमध्ये कृतिका आहे का हे शोधले. ती न दिसल्याने तो तिच्या घरी गेला. मंथनने कृतिकावर अनेक गोळ्या झाडल्या. कृतिकाचा मृत्यू झाला. त्यानंतर तिथे अनेक लोक गोळा झाले. त्यांनी आरोपी मंथनला पकडून एका खांबावर बांधले. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. नंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.