mandir employee won 12 cr

त्रिवेंद्रम. केरळमध्ये इडुक्की जिल्ह्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या २४ वर्षीय अनंधू विजयनला तब्बल  १२ कोटींची लॉटरी (won 12 cr lottery)लागली आहे. लॉटरीमुळे तो रातोरात करोडपती झाला आहे. केरळ सरकारच्या माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या ओणम विशेष थिरुवोनम बम्पर २०२० लॉटरीचा निकालात या तरुणाला लॉटरी लागली आहे. इडुक्कीमधीळ थोबाळामधील कट्टपाना येथे राहणारा अनंधू हा सध्या एर्नाकुलम येथील कडवनाथ मंदिरामध्ये वलार्क (mandir employee) म्हणून काम करतो. त्याचे वडील घरांना रंगकाम करण्याचे काम करतात.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्याच्या बहिणीची नोकरी गेली . कोच्चीमध्ये एका खासगी कंपनीत अकाऊंटंट म्हणून काम करणारी बहीण बेरोजगार झाली होती. माझ्या तिकिटावरील क्रमांक पाहिल्यानंतर मी एवढी मोठी लॉटरी जिंकलो आहे, यावर विश्‍वास बसण्यासाठी मला काही तास लागले, अशी प्रतिक्रिया अनंथूने दिली आहे. लॉटरी लागल्यानंतर मला रात्रभर झोपच आली नाही. सकाळी उठल्या उठल्या मी घरी फोन करून याबद्दल माहिती दिली तर घरच्यांचाही पहिल्यांदा यावर विश्‍वास बसला नाही, असे अनंधूने सांगितले. अगन मंदिराजवळच बसणाऱ्या लॉटरी विक्रेत्याकडून तिकिट विकत घेतले होते.