जगातील सर्वात मोठी न्यूज वेबसाईट झाली डाऊन, अनेक देशी-विदेशी News Website अचानक झाल्या क्रॅश

साईट ओपन केल्यास 503 एरर '503 Service Unavailable' येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या याबाबत शोध सुरू असून, या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. गार्डियन यूके टेक्नोलॉजी एडिटर अलेक्स हर्न यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

  नवी दिल्ली: न्यूयॉर्क टाईम्स, द गार्डियन, सीएनएन इंटरनॅशनल, वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रिट जर्नल, टाईम्स मॅगझिन आणि बीबीसी सारख्या प्रमुख देशी-विदेशी बातम्यांच्या वेबसाईट्स क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. परदेशी बातम्यांच्या या वेबसाईट्स भारतात ओपन नसल्याची समस्या येत आहे.

  साईट ओपन केल्यास 503 एरर ‘503 Service Unavailable’ येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सध्या याबाबत शोध सुरू असून, या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. गार्डियन यूके टेक्नोलॉजी एडिटर अलेक्स हर्न यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

  कोणत्या वेबसाईट्स सध्या बंद पडल्या?

  • रेडिट
  • पिनट्रेस्ट
  • ट्विच
  • न्यूयॉर्क टाईम्स
  • द गार्जियन
  • बीबीसी
  • ब्लूमबर्ग
  • फायनेंशियल टाईम्स