हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमायसिन यांचे सेवन ह्रदयासााठी घातक

दिल्ली : कोरोनाच्या उपचारासाठी प्रस्तावित हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमायसिन यांचे सेवन करणे घातक ठरु शकते. कारण हे मिश्रण ह्रदयावर गंभीर परिणाम करु शकतात. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली

दिल्ली : कोरोनाच्या उपचारासाठी प्रस्तावित हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमायसिन यांचे सेवन करणे घातक ठरु शकते. कारण हे मिश्रण ह्रदयावर गंभीर परिणाम करु शकतात. एका अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. अमेरिकेेच्या वॉडंरबिल्ट आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचे अवलोकन केले. त्यानंतर आपले निष्कर्ष जाहीर केले. या अध्ययनात २.१ कोटी केस रिपोर्ट होत्या. या रिपोर्टमध्ये १४  नोव्हेंबर १९६७ आणि १ मार्च २०२० दरम्यानच्या १३० देशांच्या उपचाराबाबतचा अहवाल समाविष्ट करण्यात आला होता. या अध्ययनानंतर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन आणि एजिथ्रोमायसिन यांचे एकत्र किंवा वेगवेगळे सेवन केल्यावरही ह्रदयावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले आहे. जास्त काळ या औषधांचे सेवन केल्यास ह्रदयविकाराचा झटका येऊ शकतो, असेही संशोधकांनी म्हटले आहे.