आता जुन्या आजारांनाही मिळणार हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर, कोट्यवधी रुग्णांना दिलासा

सध्या हेल्थ इन्शुरन्स पुरवणाऱ्या बहुतांश कंपन्या जुन्या आजारांना संरक्षण देत आहेत. मात्र असं असलं तरी नागरिकांना काही गोष्टींची खातरजमा करूनच कंपनीची निवड करण्याचा सल्ला दिला जातोय. कंपनीच्या ग्रुप इन्शुरन्समध्ये हा प्रश्न येत नाही. मात्र वैयक्तिक विमा घेताना काही गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे. 

  सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र इन्शुरन्स घेताना अनेक कंपन्या या जुन्या आजारांना संरक्षण देत नसल्याचा अनुभव येतो. आता मात्र बहुतांश कंपन्यांनी जुन्या आजारांनाही नव्या हेल्थ इन्शुरन्समध्ये संरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय.

  सध्या हेल्थ इन्शुरन्स पुरवणाऱ्या बहुतांश कंपन्या जुन्या आजारांना संरक्षण देत आहेत. मात्र असं असलं तरी नागरिकांना काही गोष्टींची खातरजमा करूनच कंपनीची निवड करण्याचा सल्ला दिला जातोय. कंपनीच्या ग्रुप इन्शुरन्समध्ये हा प्रश्न येत नाही. मात्र वैयक्तिक विमा घेताना काही गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे.

  आरोग्य विम्यासाठी योग्य कंपनीची निवड कशी करावी, निवड करताना नेमक्या कुठल्या गोष्टी पडताळून पाहाव्यात यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. मात्र प्रत्येकानं आपल्या गरजेनुसार काही गोष्टींची काळजी घेणं आणि खातरजमा कऱणं गरजेचं आहे. बघुया त्यातील काही महत्त्वाच्या बाबी.

  • क्लेमची रक्कम – इन्शुरन्सची निवड करताना प्रत्येक आजारासाठी किती रक्कमेचं संरक्षण मिळणार आहे, ते पडताळून घेणं गरजेचं आहे. काही विमा कंपन्या काही आजारांसाठी संरक्षणाची मर्यादा कमी ठेवतात. त्यामुळं आजारांची यादी तपासून कुठल्या आजारासाठी किती संरक्षण आहे, हे बारकाईने पाहणं गरजेचं आहे.
  • सेवेची मर्यादा – आपण घेत असलेल्या कंपनीच्या विम्यात किती काळासाठी संरक्षण मिळणार आहे, हे पडताळून पाहावे. हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून आपल्याला खर्च करावा लागू नये, याची सोय विम्यात असणे गरजेचे असते. मात्र काही कंपन्या ठराविक दिवसांनंतर हॉस्पिटलमधील रुमचा आणि इतर सेवांचा खर्च देणं बद करतात. त्यामुळे किती दिवस हा खर्च कंपन्या देणार, याची चाचपणी विमा घेण्यापूर्वीच करावी.
  • एकरकमी प्रिमिअर भरल्यास सूट – अनेक कंपन्या जर एकरकमी प्रिमिअम भरला, तर ग्राहकांना सवलत देतात. याचा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. काही कंपन्या तीन वर्षांची विम्याची रक्कम एकदम भरली, तर त्यावर काही खास ऑफरही देतात. ग्राहकांनी याचा शोध घेऊन कंपनीची निवड करावी.
  • सध्या अस्तित्वात असणाऱ्या आजारावरील उपचार त्या पॉलिसीत कव्हर होणार की नाही, हेदेखील पाहणं गरजेचं आहे. काही कंपन्या आधीपासून असलेले आजार कव्हर करतात, तर काही करत नाहीत. शक्यतो, ते कव्हर करणाऱ्या पॉलिसी घेणं गरजेचं आहे.
  • को पेमेंट – को पेमेंट म्हणजे काही सेवांसाठी पॉलिसीधारकांना भरावी लागणारी रक्कम. विशेषतः सीनिअर सिटिजन्सना विमा कंपन्यांसोबत स्वतःलाही काही पैसे भरावे लागतात. हा को-पेमेंटचा आकडा जिकडं कमी असेल, ती पॉलिसी घ्यावी. अनेक पॉलिसीमध्ये को-पेमेंटची अट काढून टाकता येते. मात्र त्यासाठी प्रिमिअम जास्त द्यावा लागतो.