केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची बैठक रद्द, कारण अद्याप अस्पष्ट

केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्ताराच्या(Cabinet Expansion Discussion) चर्चेदरम्यान मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली होती.ही बैठक आता रद्द(Cabinet Expansion Meeting Cancelled) करण्यात आली आहे.

    दिल्लीः केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्ताराच्या(Cabinet Expansion Discussion) चर्चेदरम्यान मंगळवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठक बोलावली होती.ही बैठक आता रद्द(Cabinet Expansion Meeting Cancelled) करण्यात आली आहे. याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

    या बैठकीत भाजपाचे प्रमुख जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांना बोलावले होते. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या बैठकीत मंत्रिमंडळातील फेरबदल व विस्ताराबाबत चर्चा होणार होती. मात्र, आता ही बैठकच रद्द करण्यात आली आहे. या बैठकीत आतापर्यंत मंत्र्यांची कामगिरी आणि भविष्यातील योजनांसंदर्भात त्यांनी सादर केलेल्या ब्लू प्रिंटवरही चर्चा होणार होती.

    गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असून, त्यासंदर्भात बैठका सुरू आहेत. उत्तर प्रदेशसह पाच महत्त्वाच्या राज्यांतील विधानसभा निवडणुका होत असून, त्यानुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह महत्त्वाचे मंत्री आणि भाजपा नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार केली जाणार होती तसेच, याच आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचं वृत्त होतं. या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांच्यासह इतर नेत्यांना स्थान दिलं जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्याचबरोबर इतर नेत्यांचीही नावे चर्चेत होती.