Indian Air Force Day 2020 the pride and glory of the Air Force

हवाई दलाचे मिग -२१ बाइसन लढाऊ विमान(Mig-21 Bison Fighter Aircraft) कोसळल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने अपघातात पायलट सुखरूप(Pilot Safe) आहे.

    भारतीय हवाई दलाचे(Indian Air Force) विमान राजस्थानच्या बाडमेरमध्ये कोसळल्याची बातमी समोर आली आहे. हवाई दलाचे मिग -२१ बाइसन लढाऊ विमान(Mig-21 Bison Fighter Aircraft) कोसळल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने अपघातात पायलट सुखरूप(Pilot Safe) आहे. प्रशिक्षणादरम्यान हे विमान कोसळले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

    राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यापासून ३५ किमी दूर मातसर गावाजवळ संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हवाई दलाचे मिग -२१ बाइसन लढाऊ विमान कोसळले आहे.वैमानिक सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. मिग क्रॅश झाल्याची माहिती मि‌‌ळ‌ताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखले झाले आहेत. गावकऱ्यांनी टँकरच्या मदतीने ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशमन दलही घटनास्थळी आले आहे.


    मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेनंतर  हवाई दलाचे अधिकारी हेलिकॉप्टरने घटनास्थळी पोहोचत आहेत.