mili doing backflip in saree

सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी साडी नेसून ‘बॅकफ्लिप’(mili sarkar video of backflip in saree) मारताना दिसतेय. या तरुणीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल(viral video) होत आहे. या व्हिडिओमध्ये ही तरुणी चक्क साडी नेसून ‘बॅकफ्लिप’(mili sarkar video of backflip in saree) मारताना दिसतेय. या तरुणीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.


व्हायरल झालेल्या या १२ सेकंदांच्या या व्हिडिओत ही तरुणी ४-५ बॅकफ्लिप मारते. ट्विटरवर आकाश रानिसनने हा व्हिडिओ शेअर केला आहे. “पुरूष मंडळी करतात ती सर्व कामं महिला करु शकतात आणि पुरूषांपेक्षा चांगल्याप्रकारे करु शकतात. कित्येक कामं तर अशी आहेत की पुरुष करु शकत नाहीत. भेटा मिली सरकारला…साडीमध्ये बॅकफ्लिप मारतानाचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय…ती टॅलेंटची पॉवरहाउस आहे”, असे त्यांनी या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीले आहे.

ट्विटरआधी हा व्हिडिओ मिली सरकारने २० नोव्हेंबर रोजी आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तिथेही या व्हिडिओला लाखो जणांनी  पाहिलं. नंतर व्हिडिओ ट्विटरवरही व्हायरल झाला.