सैन्य दलातील गॅलेंट्री पुरस्कार जाहीर

मुंबई : देशाची सुरक्षा करताना अतुलनीय कामगिरी करणार्‍या तिन्ही सैन्य दलातील जवानांना सैन्य दलाचे प्रमुख राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते गौरवण्यात येते. यावर्षी अतुलनीय कामगिरी करणार्‍या ८४ जणांची नावे स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला जाहीर करण्यात आले. यामध्ये एक कीर्ती चक्र, नऊ शौर्य चक्र, पाच विशेष सेना पदक (गॅलेंट्री), ६० सेना पदक, चार नौसेना पदक आणि पाच वायू सेना पदक यांचा समावेश आहे. तसेच ऑपरेशन मेघदूत आणि ऑपरेशन रक्षक या दोन मोहीमांमध्ये हुतात्मा पत्करलेल्या आठ जवानांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 

जम्मू काश्मीर पोलिस दलातील मुख्य हवालदार अब्दुल रशीद कलास, सीआयएसएफचे उपनिरीक्षक महावीर प्रसाद गोदरा, मुख्य हवालदार एरना नायक, हवालदार महेंद्रकुमार पासवान, मुंबईतील सीआयएसफचे हवालदार सतीश प्रसाद कुशवाह,१९ बटालियन राष्ट्रीय रायफलचे मेजर केतन शर्मा, ५ बटालियनचे लडाख स्काऊट रेजिमेंटचे नायब सुबेदार सेवांग गिआलशान, १६ कॉर्प इंटिलिजन्स अ‍ॅण्ड सर्व्हिलियन्स युनिटचे नाईक रवी राजन कुमार सिंग, ३ बटालियन पंजाब रेजिमेंटचे नाईक मनिंदर सिंग, २३ बटालियन राष्ट्रीय रायफलचे नाईक राजेंद्र सिंग, ४४ बटालियन राष्ट्रीय रायफलचे रोहित कुमार यादव, जाट रेजिमेंट ३४ बटालियन राष्ट्रीय रायफलचे रामबिर, ४ बटालियन ग्रेनडिअर्स हेमराज जाट यांना मरणोत्तर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे ऑपरेशन मेघदूतमध्ये हौतात्मे पत्करलेले डिम्पल कुमार, वीरपाल सिंग तर ऑपरेशन रक्षकमधील १८ मराठा रेजिमेंटचे वीरेशा कुराहट्टी, जम्मू आणि काश्मीर राष्ट्रीय रायफलचे कृष्णन लाल, ३३ राष्ट्रीय रायफलचे सुभाष थापा, ५७ राष्ट्रीय रायफलचे रजिंदर सिंग, मराठा रेजिमेंटचे राहुल सुलागेकर, संतोष गोपे यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.