रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे कोरोनाने निधन

रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी railway minister Suresh Angadi (६५ )यांचे कोरोनामुळे corona निधन झाले. अंगडी यांना ११ सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती.त्यांनतर त्यांच्यावर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करून माहिती दिली होती.अंगडी यांच्यावर मागील १२ दिवसांपासून कोरोनाचे उपचार सुरू होते. मात्र दोन दिवसांपूर्वी जास्त त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. मात्र कोरोनाशी त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित कन्या असा परिवार आहे.

रेल्वे राज्य मंत्री सुरेश आगंडी यांची राजकीय कारकीर्द
रेल्वे राज्य मंत्री सुरेश आगंडी हे बेळगावचे खासदार होते.२००४ ला त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढविली. तेव्हा ते विजयी झालेले. त्यानंतर ते २००९, २०१४ आणि २०१९ सलग चौथ्यांदा विजयी झाले. २०१९ च्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री पद मिळाले. त्यांना पाहिल्यादाच मंत्रीपद मिळालं होतं.त्यांनी रेल्वे डिजिटलायजेशन आणि रेल्वेच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला होता.अलीकडेच त्यांनी बेळगाव ते धारवाड व्हाया कित्तूर रेल्वे प्रकल्प मंजूर करून घेतला होता.