एमएनएमचा जाहीरनामा जाहीर ; सरकार आणणार निळी क्रांती

कमल हासन यांनी आपल्या जाहीरनाम्यातून महिला मतदारांनाही मदत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. कमल हासन यांनी महिलांविषयी अनेक आश्वासनेही दिली आहेत. ज्यामध्ये महिलांचे कौशल्य सुधारणे आणि त्याद्वारे उत्पन्न वाढविणे समाविष्ट आहे. कमल हासन यांनी म्हटले आहे की, सर्व बीपीएलधारकांना ई-गव्हर्नन्स सेवा अंतर्गत संगणक दिले जातील.

    चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी कमल हासन यांनी आपल्या पक्षाच्यावतीने मक्कल निधी मय्यमचा (एमएनएम) जाहीरनामा जारी केला आहे. १० पानांच्या जाहीरनाम्यात त्यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी एकामागून एक मोठी आश्वासने दिली आहेत. कमल हासन यांनी कोइम्बतूर येथून आपला जाहीरनामा जाहीर केला. घोषणापत्र जारी करताना कमल हासन म्हणाले की, मक्कल निधी मय्यम पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील भूजल पातळी वाढविण्याचेही काम केले जाईल. यासाठी सरकार निळी क्रांती आणेल आणि भूजल संवर्धनास चालना देईल. भूजल संवर्धनासाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात करून खास अर्थसंकल्प देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. ते म्हणाले की सेंद्रिय शेतीसाठी हरितक्रांती आणली जाईल जेणेकरून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल. कमल हासन यांनी आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे की त्यांचा पक्ष सत्तेवर आला तर हे कृषी विधेयक २०२० राज्यात लागू होण्यास रोखण्यात येईल. तसेच प्रामाणिक कर्मचाऱ्यांना २-५ वर्षांसाठी ड्युटीची मुदतवाढ दिली जाईल.

    महिलांनाही केले खुश
    कमल हासन यांनी आपल्या जाहीरनाम्यातून महिला मतदारांनाही मदत करण्यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. कमल हासन यांनी महिलांविषयी अनेक आश्वासनेही दिली आहेत. ज्यामध्ये महिलांचे कौशल्य सुधारणे आणि त्याद्वारे उत्पन्न वाढविणे समाविष्ट आहे. कमल हासन यांनी म्हटले आहे की, सर्व बीपीएलधारकांना ई-गव्हर्नन्स सेवा अंतर्गत संगणक दिले जातील. तसेच गृहिणींना दरमहा 3000 रुपये दिले जातील. शासकीय शाळांसाठी मोफत लॅपटॉप देण्यात येतील. राज्यात गरीब लोकांसाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारले जातील आणि त्यातून बनविलेली वीज या लोकांना विनाशुल्क दिली जाईल.