आणखी एक मॉब लिंचिंगची घटना, किरकोळ भांडणातून BSc च्या विद्यार्थ्याचा जबर मारहाणीनंतर मृत्यू, लवकर मरु नये यासाठी मध्ये मध्ये पाजत राहिले पाणी

ही घटना ९ ऑक्टोबरची असली, तरी आत्ता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महेंद्रगड पोलिसांनी या प्रकरणात सहाहून अधिक जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी विक्कीला (vicky) अटक करण्यात आली असून, त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये विद्यार्थी गौरव याचा मृत्यू अमानुष मारहाणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे.

  रेवाडी, हरियाणा : हरियाणातील महेंद्रगड (Mahendragad, Haryana) येथे एका मागासलेल्या जातीतील विद्यार्थ्याला अमानुषपणे लाठ्याकाठ्यांनी मारहाण (beaten) केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याने उपचारादरम्यान प्राण सोडला आहे. या व्हायरल व्हिडिओत (Viral Video) मारहाण करणारे, मध्येमध्ये या विद्यार्थ्याला पाणी पाजत असल्याचेही दिसते आहे.

  ही घटना ९ ऑक्टोबरची असली, तरी आत्ता त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. महेंद्रगड पोलिसांनी या प्रकरणात सहाहून अधिक जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी विक्कीला (vicky) अटक करण्यात आली असून, त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये विद्यार्थी गौरव याचा मृत्यू अमानुष मारहाणीमुळेच झाल्याचे उघड झाले आहे (The postmortem report revealed that the death of student Gaurav was due to inhuman beating).

  एक आरोपी व्हिडिओ करत होता, बाकी सगळे मारहाण करत होते

  व्हिडिओ सौजन्य : दैनिक भास्कर

  महेंद्रगड जिल्ह्यातील बवाना गावातील रहिवासी, १८ वर्षीय विद्यार्थी गौरव यादव दुपारी महेंद्रगडवरुन आपल्या घरी बाईकवरुन परतत होता. त्यावेळी रस्त्यात असलेल्या मालडा गावातील तलावाजवळ १० पेक्षा अधिक जणांनी त्याचा रस्ता अडवला. गौरवला काही कळायच्या तच त्याला चारही बाजूंनी घेरण्यात आले. त्यानंतर त्याला सगळ्यांनी मिळून लाठ्या,काठ्यांनी बेदम मारहाण केली, हे सगळे सुरु असताना एक आरोपी याचे मोबाईलवर चित्रणही करीत होता. त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला, घटनास्थळावरुन हाकलून देण्यात आले.

  हात जोडून जगण्यासाठी भीक मागत होता गौरव

  गौरव हात जोडून मारहाण करणाऱ्यांना विनवणी करत होता, मात्र आरोपी त्याला सातत्याने मारहाण करीत होते. मारहाण करुन दमलेले आरोपी काही वेळ शांत बसत, गौरवला पाणी पाजत आणि पुन्हा त्याला मारहाण करीत होते. या घटनास्थळावरुन गौरवला एका हॉटेलच्या मागे नेण्यात आले, आणि तिथेही त्याला बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीने बेशुद्ध पडल्यानंतर गौरवला तिथेच सोड़ून आरोपी फरार झाले. गौरवचे नातेवाईक त्याला रुग्णालयात घेऊन गेले, तिथे त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

  रवीसोबत झाले होते गौरवचे भांडण

  १५ सप्टेंबरला देवीच्या जागरणावेळी गौरव आणि रवी यांच्यात किरकोळ भांडण झाले होते. त्याचाच राग काढण्यासाठी ही मारहाण करण्यात आली. व्हिडिओतही रवी शिवीगाळ करत गौरवला सर्वाधिक मारहाण करत असल्याचे दिसते आहे. या प्रकरणातील आरोपींना शोढण्यासाठी पोलिसांनी ३ पथके तयार केली असून, ते आरोपींचा शोध घेत आहेत.

  काही दिवसांपूर्वी राजस्थानातील हनुमानगडचा असाच एक व्हिडिओ समोर आला होता. त्यातही आरोपी पीडित तरुणाला मध्येमध्ये पाणी पाजून त्याला मारहाण करीत होते.